आमच्या बद्दल

[doctor_aboutus sc_title=”आमच्या बद्दल ” sc_desc=”जयवंतराव निबाजी गायकवाड (जे. एन. जि.) ट्रस्टमध्ये आपले स्वागत आहे.
जे. एन. जि. ट्रस्ट या संस्थेची स्थापना २०07 साली झाली. आमच्या संस्थेचा उद्देश हा समाजकार्य व मदत, गरजु व आजारी लोकांना औषधी व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे तसेच अनाथ मुलांना आश्रय देणे हा होता व आहे. ह्या अंतर्गत संस्थेने अपंग मुलांना ३ चाकी सायकल वाटप केले, मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप असे विविध उपक्रम राबवले. त्यांना व्यवसाय सुरु करण्यासाठीही मदत केली. वैद्यकीय क्षेत्रात मोलाचे कार्य केले.

कालांतराने संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात पदार्पण केले. वैद्यकीय क्षेत्र निवडून या क्षेत्राच्या अंतर्गत नर्सिंग क्षेत्र निवडून मुला-मुलींसाठी नर्सिंग असिस्टंट (मिड वायफरी ) , रुग्ण सहाय्यक कोर्स , ऑपरेशन थिएटर असिस्टंट कोर्स , डि. एम .एल.टी .कोर्स महाराष्ट्र शासनाच्या परवानगीने मान्यता प्राप्त करून घेतले. त्यामुळे दहावी,बारावी पास-नापास विद्यार्थ्यांसाठी नवसंजीवनी ठरले. जे विद्यार्थी -विद्यार्थिनी दहावी ,बारावी पास असून शिक्षणाची ओढ असून परिस्थितीमुळे मागे राहिलेल्यांना आणि जे विद्यार्थी नापास झाल्यामुळे त्यांनी शिक्षणाची चाहूल सोडली होती अश्या सर्व विद्यार्थ्यांना नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या बहुदा जे. एन. जि. ट्रस्ट या संस्थेने करून दिल्या . ह्यामुळे अनेकजण स्वत:च्या पायावर उभे राहून समाजात ताठ मानेने जगू लागली.

संस्थेने आदिवाशी भागांत (नाशिक, ठाणे, पालघर, शहापूर, मुरबाड, धुळे) या ठिकाणी नर्सिंग प्रशिक्षण देण्यासाठी जे. एन. जि. ट्रस्ट संचलित सेवा नर्स अँण्ड पँरामेडिकल इन्स्टिट्युट सुरु केले. तेथील विद्यार्थी व विद्यार्थिनींना नर्सिंग क्षेत्रात प्रशिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध झाली. त्यामुळे प्रामुख्याने या भागातील बेरोजगारीचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली तसेच या भागातच देखील येथील विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. संस्थेने हजाराहून अधिक मुला-मुलींना शिक्षण देऊन स्वयंरोजगार निर्माण करून दिला आहे आणि आजही संस्था नर्सिंग क्षेत्रात विविध कोर्सेसद्यारे शिक्षण उपलब्ध करून देत आहे. अश्या प्रकारे संस्थेची यशस्वी वाटचाल चालू आहे.” sc_image=”395″]

[doctor_team sc_title=”कार्यकारणी “]
[doctor_partners sc_title=”Partners”]